a2 milk in pune

“दूध ते दूध…त्यात असलं ए टू आणि बी टू कुठून आलं?
फार्फातर …. म्हणजे ….. हे आपलं ..
गायीचं किंवा म्हशीचं दूध समजू शकतो…

वास्तविक पहाता, दोष त्याचा नाहीच्चे.
या धावत्या काळात, घरात आपणहून चालत येणारं दूध हे नक्की कुठल्या प्रतीचं आहे हे जाणून घ्यायला देखील कुणाकडे वेळ नाहीये . पोरांच्या मागे लागून ते त्यांनी संपवल की आपण खूष.
कारण, आहे दुधातून त्यांना प्रोटिन्स, कॅल्शियम, व्हिटामिन्स मिळणारच ह्याची आपल्याला मनोमन खात्रीच असते.

पण हे दूध कोणत्या गायीचं होतं? त्या गायींचं कशाप्रकारे संगोपन केलं जातं? त्यांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो ? त्यांना काही इंजेक्शन दिली जातात का ? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात. किंबहुना काहींना असे प्रश्न पडत देखील नाहीत. खरंय न?

मित्रांनो, दुधामध्ये प्रथीने असतात हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि प्रथीने बनतात केसीनपासून.
दुधामधील या केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1दूध आणि A2 दूध.
विदेशी वंशाच्या जर्सी, होल्स्टेन, फ्रीजीयन, रेड डॅनिश किंवा यांपासून तयार केलेल्या संकरीत किंवा हायब्रीड गायी यांचे दूध हे A1 प्रकारचे असते.

जेव्हा शास्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायींच्या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळेच या दुधास A2 दूध असे म्हणतात

तुम्हांस प्रश्न पडेल की गायीचं दूध ते गायीचं ? मग त्यात देशी-विदेशी असा काय फरक पडतो?
तर फरक हा पडतोच. फार फरक पडतो.
गायींच्या जातीचा/ प्रजातीचा, तीच्या रंगाचा, तिच्या एकूण आहार तसंच विहाराचा तिच्या दुधावर परिणाम होतो. त्यानुसार दुधाचे गुणधर्म बदलतात. म्हणजे असं बघा, पर्वतावर किंवा नदी जवळ विहार करणाऱ्या किंवा समुद्रासपाटी जवळच्या गायी यांच्या दुधाचे गुण हे वेगवेगळे असतात.
भारतीय वंशाच्या, मुख्यत्वे गुजरात मधील गीर प्रांतात आढळणाऱ्या गीर / देशी गायीचे दूध हे इतर संकरित गायींच्या तुलनेत आरोग्याला अतिशय पोषक असे A2 दूध आहे. ज्यात रोगप्रतिकार शक्ती, शरीराला लागणारे सर्व अन्‍नघटक, प्रथिने, फॅट, कार्बोहायड्रेट, खनिजे, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. हळूहळू आपल्याकडे आता या A2 दूधाबद्द्ल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे त्यामुळे या गायीच्या दुधाची मागणी प्रचंड वाढत आहे.

आणि मुख्य म्हणजे, इतर दुग्धविकास तंत्राप्रमाणे यांना कुठल्याही गोठ्यात बांधलेलं नसतं , मुक्त संचार हा त्यांच्या संगोपनाचा महत्वाचा गुण लक्षात घ्यायला हवा.
मित्रांनो, मग मला सांगा, अश्या नैसर्गिक पध्दतिने संगोपन करून संवर्धन केलेल्या भारतीय गाईंचं शुध्द , सात्विक दुध…….म्हणजे देशी गाईच दूध किंवा A२ दुधाला व त्या पासून बनलेल्या A२ तूपाला मान्यता मिळायला हवी ना. .

गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील काही शेतकरी व काही व्यावसायिक A२ दूधाचा व्यवसाय अविरत करत आहेत.
‘‘वेदाज मिल्क ‘ हे त्यातलंच एक विश्वासू आणि महत्वाचं नाव. पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या मंचर गावात मुक्तपणे संचार करणाऱ्या गीर गायींच्या दुधाचा पुरवठा वेदाज तर्फे केला जातो. कठीयावाडी जमातीतील लोक अगदी मातेसमान या गायींचा सांभाळ करतात. त्यांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच इंजेक्शन दिल्या जात नाही. पुनर्वापरासाठी उपयुक्त अश्या काचेच्या बाटल्यांचा दुधासाठी वापर केला जातो.

चला तर मग,
आज पासून सर्वजण कुठल्याही बंधनात न अडकलेल्या आनंदी अश्या देशी गीर गाईचे A२ दुध व तूप वापरण्यास सुरवात करून संपूर्ण कुटुंब निरोगी बनवूया.